Monday, March 28, 2016

गजबजलेल स्वप्न...

गजबजलेल स्वप्न...

तळ हाताहुन लाखपट भेगा
नशीबी आपल्या धरणी
शुष्क कठोर मेघ आजही
घालती असंख्य घाव त्वेषान्

लढ़ा आपुला ना रक्ताचा
ना त्या गोळ्या बंदुकीचा
तो तर थेट त्या आकाश्यातल्या देवाशी
अन् वर्षोंवर्षे रुसलेल्या निसर्गाशी

अखंड पेरलेल्या मृगजळात
हिरव स्वप्न आजही आपुल् बुडालेल्
आश्वासनांच्या जाळ्यात पिढ्यान पिढ्यांच्या
समाध्या उंचच उंच झाडावर विसावलेल्

पण भागेल तृष्णा सर्ज्या राज्याच्
भरभरेल आपुली भूमी सोन्याच्या दाण्यान्
उठ दुःख सरेल श्रमदानान अन घामान्
चल भरू सागर स्वप्नाच् थेंबा थेंबान्

राऊ
28|03|2016

No comments: