Wednesday, April 6, 2016

मृगजळ...

मृगजळ...

नयनी आभाळ सामावले होते तिच्या
माझ्याही प्रेमास कुठे होते क्षितिज
क्षणात डुंबुनी हृदयाने माझ्या
तळ गाठला केंव्हाच त्या नभाचा...

मोह की प्रेम अंतर कापेना
मंजुळ पंजनाचा घाव निराळा
गुंती हृदय तिथे सुटका कसली
आजन्म परका झालो मीच मजला...

भान बेभान नशा प्रीतीची
उगाच भरोसा केला अग्निशी
उमजला खेळ तरी टाकले फासे
पोळले कंठ तरी गीत गाईले...

पोळले कंठ तरी गीत गाईले...

राऊ 
३०I०८I २०१5

व्याकुळ शब्द ...

व्याकुळ शब्द ...

पाषाण हृदयी शुष्क विश्वी
नसती बहरती तृण कधी
नसे सापड़ी त्यास आधार जगती
मग व्याकुळ शब्द उतरती कंठी...

राऊ I

मेघ...

मेघ...

धुंद मेघही आज रमले लपंडावात...
तरीही बाल तृण तृष्णात हसरे...
अबोल मृग व्याघ्र पेचात मृगजळाच्या..
आणखी एका बळीच्या बळीने हैराण जगसारे..


राऊI

पाण्यासारखी नाती...

पाण्यासारखी नाती...

ना रंग ना आकार
ना उकार ना पूर्णविराम
ना बेरीज ना वजाबाकी
प्रामाणिक नाती मुळातच पाण्यासारखी

विराघळण्याचा धर्मच आगळा
कर्माचा बंध तर कुठे निराळा
कर्णासम कर्त्तव्य दांडगे
उगाच उमपा कश्याला कुणाशी

मी पणाचा मी तिथे रुसवा
जिव्हाळयाची माती तिथे हसरी
मनाच्या मोठ्ठेपनाच् गाढ़ सौंदर्य तिथे
बलिदानाची रेश क्षितिजावरूनही भिंतीसारखी

आभाळासारखी खोल तरीही
एका हाकेच्या अंतरावर
आजन्म गुंतलेला कर्तव्याशी तरीही
वाऱ्यासारखा स्वच्छंद अंतरी...
नाती..तीच पण गुणधर्म मात्र वेगळे
पाण्यासारखी अगदी पारदर्शक...

राऊ...
१६I ०२I २०१६

जिव्हाळ्याची भुतं...


जिव्हाळ्याची भुतं...

निर्जन रात्री एकाकी फिराव तर
आजही ती जिव्हाळ्याची भुतं
हृदय सुखान् भरभरुन टाकतात
उजेडताच तेच संसारी देवही
माझा रस्ता निर्मनुष्य करतात
...

राऊ।

निरोप...

निरोप...

तुला दिलेल्या निरोपानंतर..
त्या मधाळ शब्दानी तर कहर केला...
आजकाल विचार करूनही शब्द आठवेंनात..
जणू ते तुझ्यासोबत शब्दही परके झाल्यासारखे
येशील परत का सोबत माझ्या
माझ्यासाठी नव्हे तर त्या
अबोल शब्दांवर थोड़ी दया कर...

राऊ 
१०I ०८I२०१५
रातौ  ०९:५० 

एक शुन्य मी...

एक शुन्य मी...

असा मी कसा मी...असा कसा मी...
रुपेरी आसमंतात श्वेत ढग मी...
क्षितिजविहीन सागरातला ओबड धोंबड शिंपला मी...
न संपणाऱ्या रस्त्यावरचा फुटलेला मैलाचा दगड मी...
अनंत स्वप्नाळु लोकातला एक शुन्य मी...
एक शुन्य मी...

राऊ 
२१I ०८I २०१५
रातौ ०८:२०