आधीच थोडा वेडा मी...
काय करू म्हणजे समजेल तुला
काय सांगायचे आहे मला
काय आहेस तू माझ्यासाठी
जणू श्वासच तू माझ्यासाठी
आधीच थोडा वेडा मी...
नाही कसं समजत तुला
केवढ सोप कोडं गं
नाही कसं पटत तुला
एवढी सोप्पी गोष्ट गं
आधीच थोडा वेडा मी...
नाही कसं दिसत तुला
डोळ्यात फक्त तूच गं
नाही कसं जाणवत तुला
श्वासांची चाहूल गं
आधीच थोडा वेडा मी...
तूनेच शिकविले प्रेम मला
तुझाच लागला लळा मला
तुझ्याच भोवती जग फिरते
जणू विश्वात तूच शाश्वत गं
आधीच थोडा वेडा मी...
न समजून करू नको
गणित अवघड गं
न बघून करू नको
स्वप्न बेरंग गं
आधीच थोडा वेडा मी...
असेन खूप भावनिक मी
देवदास नाही मला व्हायचं
असेन खूप शूर मी
राऊ नाही मला व्हायचं
आधीच थोडा वेडा मी...
आणलो नसलो तारे तरी
तुझ्यासाठी तारा बनेन मी
दिलो नसलो प्राण जरी
तुझ्यासाठी प्राण घेईन मी
आधीच थोडा वेडा मी...
तुझ्यासाठीच जगतोय गं
तुझ्यावरच मरतोय गं
तुझ्याभोवतीच विश्व गं
तुझ्यासाठीच मी गं
आधीच थोडा वेडा मी...
कधीतरी डोळे उघड गं
तुझ्याच समोर उभा गं
एक होय साठी
केव्हाचा जीव अडकलाय गं
आधीच थोडा वेडा मी...
होईन पुरता वेडा मी...
विपुल आरवाड़े
१९.०५.२०१०