Wednesday, March 30, 2011

मनातल्या मनात सगळं...पण राहूनच गेलं....

                  मनातल्या मनात सगळं...पण राहूनच गेलं.... 

किती वेळा दिसायची ती
सारखाच लपून बघायचो मी
तर कधी सहजच समोर यायची ती
एकदा तरी तिच्या डोळ्यात स्वतःला बघायचं....?
मनात पाहिलं...पण राहूनच गेलं....

किती बोलायचो आम्ही
सारखीच बडबड करत असायची ती
मी मध्येच कधीतरी बोलायचो
माझ्या प्रेमाचे शब्द तिला सांगायचं....?
मनात सांगितलं...पण राहूनच गेलं....

सारखंच...किती फिरायचो आम्ही
एका ठिकाणी ती कधी थांबयाचीच नाही
मी तर पुरता कंटाळून जायचो
वाटायचं एकदा तरी हातात हात घालून फिरायचं...?
मनात फिरलो...पण राहूनच गेलं....

किती भांडायचो आम्ही
सारखंच रुसून बसायची ती
आणी मग उगीचच चिडवायचो मी
आता मी रुसून बसायचं ठरवलं....?
मनात रुसलो...पण राहूनच गेलं....

नेहमी...किती हसत रहायची ती
जरा तरी हसत जा...म्हणायची मला ती
मग मी आपला नुसताच हसायचो
आता तिच्यासारखं खूप हसावसं वाटतं....? 
मनात हसतो...पण राहूनच गेलं....


किती सुंदर दिसायची ती
दररोजच नवीन भासायची ती
मला तर रात्रंदिवस आठवायची ती
तिच्यासमोर तिच्या सौंदर्याची तारीफ करायची....?
मनात तारीफ केलं...पण राहूनच गेलं....
 
तिला संध्याकाळ खूपच आवडायचं
खूपच खूष असायची ती
मला तर सकाळ-संध्याकाळ सारखेच वाटायचे
परत तीच संध्याकाळ आठवावंस वाटतं....?
मनात आठवलं...पण राहूनच गेलं....


तिला love songs  किती आवडायचे
सारख काहीतरी गात असायची ती
मी तर कधी कधी bore होऊन  जायचो
आता तिच्यासाठी love  songs गावसं वाटतं....? 
मनात गातो...पण राहूनच गेलं....

तिला जगायला खूप आवडायचं
नेहमीच तर आनंदी दिसायची ती
मी तर आपला उगाचच जगायचो
आता तिच्यासारखं जगावसं वाटतं....? 
मनात जगतो...पण राहूनच गेलं....


रंग तर तिला खूपच आवडायचे
रंगबीरंगी फुलपाखरामध्ये नवं जग शोधायची ती
मी तर तिच्याच रंगात बुडलेला असायचो
आता परत त्याच रंगात बुडावंस  वाटतं....?
मनात बुडतो...पण राहूनच गेलं....



सारखंच तर भेटायचो आम्ही
कदाचित तिलाही भेटावसं वाटत असावं
मला तर तिला  भेटल्याशिवाय करमायचंच नाही
तिला शेवटचं भेटायचं ठरवलं....?
मनात भेटलो...पण राहूनच गेलं....


मनातल्या मनात सगळं...पण राहूनच गेलं....



विपुल आरवाडे
२९.०३.२०११

5 comments:

Anonymous said...

This is THE BEST ONE from you.
Loved it man.Keep going.

Swapnil.

Shweta said...

Atishay chhan.....! Amchyakade tumchyasarkhe changle shabd nahiye comment karayla tevha fakt 'Khupch chhan kavita....manatlya manat nahi agadi thet..."

santosh chudappa said...

really inimitable..

umeshpatil said...

Nice Post.

-Umesh Patil.

kdesh said...

zakaaaaas aahe