Wednesday, January 20, 2010

झिंग

           झिंग

झिंग आहे आकाशाची
पक्ष्यांसोबत गाणी म्हणण्याची  
ढगांशी  स्पर्धा करण्याची
उंचच  उंच उडण्याची...

झिंग आहे पावसाची
तोंडावर पडणाऱ्या थेंबांची
मातीच्या त्या अप्रतिम सुगंधाची
पाण्यात नावं सोडण्याची...

झिंग आहे तिला पाहण्याची
तिला रोजच स्वप्नात बघण्याची
तिच्या गल्लीत घर बांधण्याची
सेकंदाच्या झलकसाठी होणारया धावपळीची ...

झिंग आहे सिनेमाची
हॉरर  फिल्म पाहून घाबरण्याची
प्रोजेक्टरच्या  खिडकीची
डायरेकटरच्या  जागी आपलं नावं बघण्याची...

झिंग आहे कट्याची
१७६० विषय काढण्याची
उगीचच दंगा घालण्याची
रात्रभर गप्पा टाकण्याची....

झिंग आहे गाण्यांची
गुलजारच्या शब्दांची
किशोरच्या आवाजाची
पंचमदाच्या संगीताची....

झिंग आहे क्रिकेटची
सचिनच्या पॅडल स्विपची
मॅकग्रा च्या स्लेजिंगची 
आक्रमच्या  रीव्हर्स  स्विंगची...

झिंग आहे पुस्तकांची
हॅरी  पॉटरच्या जगात हरवण्याची
पु.ल.च्या  कोटीवर हसण्याची
'राऊ' परत परत वाचण्याची...

झिंग आहे धुंदिची
आइस टाकलेल्या वोडकाची 
टकीलाच्या लागोपाठ शॉटसची
नशेत चालताना मित्राच्या आधाराची...
 
झिंग आहे निवडणुकिची
प्रचाराच्या रनधूमळीची 
घोषणाच   देत राहण्याची
गुलाल उधळण्याची...

झिंग आहे  सौंदर्याची  
मोनालिसच्या हसरया चेहरयाची
अजंताच्या बोलक्या  लेण्याची
विंचीच्या  गूढ़ चित्रांची...

झिंग आहे इंटरनेटची 
फेसबूकच्या  वॉलवर लिहिण्याची
कुणाशीही  चॅटिंग  जमविण्याची
क्लिक  वर क्लिक करण्याची ...

झिंग आहे देशभक्तीची
गांधीजींच्या चरख्याची
राजीवजींच्या स्वप्नांची
तिरंग्याला सलामी देण्याची...

झिंग आहे प्रेमाची
झिंग आहे मैत्रीची
झिंग आहे नात्यांची
झिंग आहे आयुष्याची
झिंग आहे जगण्याची.... 

विपुल आरवाड़े
१९.०१.२०१०

Saturday, January 9, 2010

काल होतो शोधात मी माझ्या...

      काल होतो शोधात मी माझ्या

काल होतो शोधात मी माझ्या
कोण मी? कोण मी?
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

पेचात मी माझ्या
कसा शोधू मी माझ्याला
कुणाचं  नाव घेऊ, कुणाची  पूजा करू
कुणाची प्रार्थना करू,कोणाला दंडवत घालू

गेलो मंदिरात,गेलो मस्जिदित
गेलो चर्चमध्ये
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

वाचलं पुराण,वाचलं कुराण
वाचलं बायबल
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

चर्चा  चाणक्याशी,चर्चा गालीबाशी
चर्चा शेकसपिअरशी
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

भांडलो नरेन्द्राशी,भांडलो ओसामाशी
भांडलो बुशशी
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

केलं गुगलिंग, केलं ड्रिंकिंग
केलं रीडिंग
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

स्वप्नांत राम,स्वप्नांत रहीम
स्वप्नांत येशू
पण मी काही सापडलो नाही...
पण मी काही सापडलो नाही...

दिसला वेडा,विचारलं मी त्याला
कोण मी?कुणाचा मी?
हसला वेडा...म्हणाला...
तू तारा.. तू  आकाशाचा...
तू स्वप्न..तू स्वप्नांचा...
तू मधु...तू धुंदीचा...
तू सूर.. तू संगीताचा...
तू रंग...तू चित्रांचा... 
तू भुंगा...तू फुलांचा...
तू मुसाफिर..तू रस्त्यांचा...
तू माणूस...तू माणसांचा...

तू माणूस...तू माणसांचा...


विपुल आरवाडे
०८.०१.२०१०