कधीतरी.....
कधीतरी पावसाळयात
तू असावीस सोबत
भिजलेल्या केसांनी
मला सतवीत.....
कधीतरी आसमंतात
तू असावीस सोबत
इंद्रधनुश्यातील रंग घेऊनी
मला रंगवीत.....
कधीतरी शिशिरात
तू असावीस सोबत
गरम श्वासांनी
मला ऊबवीत.....
कधीतरी एकांतात
तू असावीस सोबत
एकटा असलो तरी
मला आधार देत.....
कधीतरी माळरानात
तू असावीस सोबत
सारखा नकार देत
मला चिडवीत....
कधीतरी मधुशाळेत
तू असावीस सोबत
होऊनी मदिरा
मला धूंदवीत.....
कधीतरी अंधारत
तू असावीस सोबत
प्रेमाचं चांदनं बनत
मला उजळीत.....
कधीतरी प्रेमात
तू असावीस सोबत
होउनी मीरा
मला हृदयात जपत.....
कधीतरी एकदा
तू असावीस सोबत
कायमची
माझ्या श्वासांसारखी.....
कधीतरी.....
कधीतरी.....
विपुल आरवाडे
१९.०९.२००८